‘गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग’

संजय राऊत शुक्रवारी रात्री जळगाव रेल्वे स्थानकावर आले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मात्र शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र आता ठाकरे गटाने गुलाबराव पाटलांना सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन […]

‘गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग’

संजय राऊत शुक्रवारी रात्री जळगाव रेल्वे स्थानकावर आले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मात्र शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र आता ठाकरे गटाने गुलाबराव पाटलांना सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा असे आव्हान दिले आहे.

संजय राऊत म्हणाले,”कोणत्याही क्षणी निवडणुका घ्या हे सिद्ध होईल. गुलाबराव पाटील यांनी सांगावं मी तिथेच राहून दाखवतो. गुलाबराव पाटील पाटील यांना वाटत असेल की मी त्या हॉटेल मध्ये राहावं तर मी राहून दाखवतो त्यांनी घुसून दाखवावं” असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

“खरंतर गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग आहे. एक चित्रपट होता तसे हे आहे म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे”. पाचोरा येथील सभेत आमच्यावर बोलाल तर सभेत घुसेल असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी घुसून दाखवा असे म्हंटल्यावर गुलाबराव पाटील मागे सरसावले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number