वृत्तसंस्था, गुजरात
गुजरात किनारपट्टीनजीक बुधवारी मर्चंट नेव्हीच्या एका तेलवाहक जहाजाला आग लागलीय. या जहाजात तब्बल ३० हजार टन हाय-स्पीड डिझेल असल्याचे सांगण्यात येतंय.
समुद्रात तेल पसरले आहे किंवा नाही याबाबत अजून समजू शकले नसल्याचे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. एमटी गणेश हे तेलवाहक जहाज गुजरातच्या कांडलातील दिनदयाल बंदरापासून 15 नॉटिकल मैल लांब आहे.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास या जहाजाला आग लागली. भारतीय तटरक्षक दलाने तत्परता दाखवत जहाजाच्या चालकासह सर्व 26 क्रू मेंबर्सना वाचवले आहेत. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.