वृत्तसंस्था, नवी दिल्ली
संपुर्ण देशाचं लक्ष असलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीचा निकाल जवळपास हाती आलाय. दोन्ही राज्यात भाजपने कमळ फुलवले आहे. गुजरातमध्ये भाजपने सत्ता टिकवली, तर हिमाचलमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. गुजरातमध्ये भाजपला 99, काँग्रेस 80, राष्ट्रवादी काँग्रेस 1, आणि अन्य दोन अशा जागा मिळाल्या आहेत.
गुजरात विधानसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्येच त्यांना धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसचे नेते सुद्धा ताकतीनिशी मैदानात उतरले होते. गुजरातमध्ये 182 पैकी दीडशे जागा जिंकू असं छातीठोकपणे सांगणाऱ्या, भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शंभर जागांवरच विजय मिळवता आला.