वृत्तसंस्था, गुजरात
देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधासभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्यात. गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात हे मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी 9 आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 14 डिसेंबरला मतदान होणाराय. तर, 18 तारखेला मतमोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी केलीय.
तसेच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आजपासूनच गुजरातमध्ये आचारसंहिता लागू करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 22 जानेवारीला गुजरात विधानसभेचा कार्यकाळ संपत असून गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकीत एकूण 4 कोटी 33 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 50 हजार 128 मतदान केंद्र असणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे.