महाएक्झिट पोलचा महानिकाल; गुजरातचा बालेकिल्ला भाजप राखणार?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   गुजरातची विधानसभा निवडणूक 2019 च्या लोकसभेची सेमीफायनलच. सर्वांचंच लक्ष वेधलेली. आज दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपलाय. दावे-प्रतिदावे सुरु झालेयत. त्याचवेळी एक्झिट पोलचे अंदाजही व्यक्त होऊ लागलेयत. जय महाराष्ट्रनं एक वेगळा प्रयत्न केलाय. सर्व प्रमुख एक्झिट पोलचे अंदाज एकत्र करुन त्यांच्या सरासरीचा. त्यातून समोर आलेला महाएक्झिट पोलचा महानिकाल सादर करतोय.   महाएक्झिट पोल […]

महाएक्झिट पोलचा महानिकाल; गुजरातचा बालेकिल्ला भाजप राखणार?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातची विधानसभा निवडणूक 2019 च्या लोकसभेची सेमीफायनलच. सर्वांचंच लक्ष वेधलेली. आज दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपलाय. दावे-प्रतिदावे सुरु झालेयत. त्याचवेळी एक्झिट पोलचे अंदाजही व्यक्त होऊ लागलेयत. जय महाराष्ट्रनं एक वेगळा प्रयत्न केलाय. सर्व प्रमुख एक्झिट पोलचे अंदाज एकत्र करुन त्यांच्या सरासरीचा. त्यातून समोर आलेला महाएक्झिट पोलचा महानिकाल सादर करतोय.

 

महाएक्झिट पोल अंदाजांनुसार गुजरातचा बालेकिल्ला भाजप राखताना दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृहराज्य असणाऱ्या गुजरातचा कौल त्यांच्या भाजपालाच मिळताना दिसतोय. महाएक्झिट पोलच्या सरासरी निकालानुसार भारतीय जनता पार्टीला 116 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच 2012 मध्ये मिळालेल्या 115 जागांपेक्षा एक जागा वाढताना दिसतेय.

मात्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 6 आमदारांचा समावेश भाजपच्या सध्याच्या संख्याबळात केला तर भाजपचे संख्याबळ काहीसं घटलेलं दिसतंय. त्य़ाचवेळी काँग्रेसला 65 जागा मिळवताना दिसतेय. याचा अर्थ काँग्रेसला 2012 च्या 61च्या तुलनेत 4 जागांचा फायदा होताना दिसतोय. अर्थात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना वजा केला तर ते संख्याबळ आणखीच वाढल्याचं दिसतंय. अर्थात तरीही विजय हा विजयच असल्यानं अटीतटीच्या लढतीत काँग्रेसनं कसोशीनं प्रयत्न करुनही भाजपच बाजी मारत सत्ता टिकवताना दिसतेय. नेमकं मतदानयंत्रांमध्ये काय दडलंय ते सोमवारी अठरा तारखेलाच उघड होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number