GT vs DC IPL 2026 : गुजरातचं विजयाचं खातं उघडणार? शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या GTसमोर अपराजित DCचं आव्हान

आयपीएल 2026 रंगात आलेले आहे. आयपीएल 2026चे अधिकतर सगळे सामने अटीतटीचे झाले आहेत. या हंगामाचा 14aवा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होणार आहे.

GT vs DC IPL 2026 : गुजरातचं विजयाचं खातं उघडणार? शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या GTसमोर अपराजित DCचं आव्हान

आयपीएल 2026 रंगात आलेले आहे. आयपीएल 2026चे अधिकतर सगळे सामने अटीतटीचे झाले आहेत. या हंगामाचा 14aवा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होणार आहे. दिल्लीची सुरुवात अप्रतिम झाली आहे. दिल्लीने पहिले दोन्ही सामने जिंकले, तर गुजरातने पहिले दोन्ही सामने गमावले. गुजरातला अजूनही पहिल्या गुणांचा शोध आहे. जर दिल्ली सामना जिंकला तर त्यांना  गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जायची संधी आहे. 

हेही वाचा – RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत 'पटलन'ची गाडी पलटी! मुंबईचा सलग दुसरा पराभव तर पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानची अव्वल कामगिरी 
 

दिल्ली संघाची कामगिरी पहिल्या दोन सामन्यांत अप्रतिम झाली आहे. यात समीर रिझवीचा सिंहाचा वाटा आहे. त्याने पहिल्या सामन्यात लखनऊ विरुद्ध नाबाद 70 धावांची खेळी केली, तर मुंबई विरुद्ध 90 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनच्या जागी समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्सला मागत होते, मात्र दिल्लीने हे दोन खेळाडू देण्यास नकार दिल्याने हा ट्रेंड फिस्कटला. संघ व्यवस्थापनाने ठेवलेल्या त्या विश्वासाची परतफेड समीरने केली असे म्हणता येईल. दिल्लीसाठी अजून के. एल. राहुलची हवी तशी कामगिरी आलेली नाही. राहुल पहिल्या दोन्ही सामन्यात लवकर बाद झाला. जर राहुलदेखील फॉर्ममध्ये आला, तर राहुल आणि निसंका यांची जोडी दिल्लीसाठी चांगली फलंदाजी करत मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवू शकतात. दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यांच्याकडून कोणाला खास काही अपेक्षा नव्हती. ऑनपेपर दिल्ली गुजरातला सहज मात देऊ शकते असे दिसते, पण क्रिकेट या खेळात काहीही निश्चित नसतं.

हेही वाचा –IPL 2026: IPL मध्ये 2400 कोटींचा तोटा? ललित मोदींचा मोठा दावा; धक्कादायक कारण समोर, BCCI चं नियोजन… 

गुजरात टायटन्ससाठी 'ऑल इज नॉट वेल' असे म्हणता येईल. 'टीम कॉम्बिनेशन' जुळलेले नाही. संघ शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांच्यावर खूप अवलंबून आहे. इतर फलंदाज त्यांना योग्य ती साथ देण्यास सक्षम ठरत नाहीयेत. शेरफेन रदरफोर्डला मुंबईला देणे हा निर्णय सध्यातरी चुकीचा दिसत आहे. गुजरात जेसन होल्डरला संघात समाविष्ट करणार का ? हा मोठा प्रश्न आहे जो अनुत्तरित आहे. जेसन होल्डरच्या येण्याने संघ बळकट होईल हे नक्की आहे, पण कोणा एका विदेशी खेळाडूला बाहेर बसवावे लागेल हे नक्की आहे. गुजरातची गोलंदाजी चांगली कामगिरी करत आहे.  रशीद खानने दोन्ही सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे.  त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा गुजरातला असेल. गुजरात दिल्लीला आश्चर्यचकित करू शकते, मात्र सगळ्या खेळाडूंना एकत्र येऊन चांगली कामगिरी करावी लागेल.  

हायलाईट्स –

के. एल. राहुलने आतापर्यंत स्पर्धेत फक्त एक धाव केली आहे, पण सलामीला फलंदाजी करताना तो मोहम्मद सिराजचा सामना करण्यास उत्सुक असेल: त्याने नऊ डावांमध्ये 79 चेंडूंत 170 च्या स्ट्राईक रेटने सिराजच्या गोलंदाजीवर १३५ धावा ठोकल्या आहेत. तो सिराजच्या गोलंदाजीवर फक्त एकदाच बाद झाला आहे. मात्र राबादने 12 डावांमध्ये 22 च्या सरासरीने राहुलला तीन वेळा बाद केले आहे.

MI विरुद्धच्या आपल्या सामना-विजयी 90* धावांच्या खेळीमुळे, रिझवी सलग तीन वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा केवळ सातवा आयपीएल क्रिकेटपटू ठरला 

खेळपट्टी आणि परिस्थिती – 

दिल्लीच्या खेळपट्टीवर जास्त धावा होणारा सामना अपेक्षित आहे. सामन्याच्या दिवसापर्यंत अधूनमधून पाऊस पडत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी हवामान स्वच्छ होण्याची  शक्यता असली तरी, खेळपट्टीवर अतिरिक्त ओलावा टिकून राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number