देशात GST लागू झाल्यानंतर शिवसेनेेने केले सरकारला सावध

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे   जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. जीएसटीमुळे जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे शहरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.   1 जुलैच्या मध्यरात्रीपासून जकात नाके ओसाड पडले आहेत.  मुंबईच्या […]

देशात GST लागू झाल्यानंतर शिवसेनेेने केले सरकारला सावध

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. जीएसटीमुळे जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे शहरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

त्यामुळे जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

 

1 जुलैच्या मध्यरात्रीपासून जकात नाके ओसाड पडले आहेत.  मुंबईच्या प्रवेशद्वारावरील जकात चौक्या आणि पोलीस हटवल्याने मुंबईला सुरक्षेचं भगदाड पडलं आहे. 

या भगदाडात घुसून कुणी घातपात घडवू नये. जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईची काळजी घ्या. हा जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये

यासाठी शिवसेना सरकारला सावध करत असल्याचे राऊत यांनी म्हंटले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number