राष्ट्रवादीच्या दिनदर्शिकेमध्ये विठ्ठलाच्या चेहऱ्यावर हिरवा चांद आणि बोकड

विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी पायी वारी करतात. विठुरायावरची श्रद्धा ते दिंडीतून व्यक्त करीत असतात. परंतु यातही अनेकांच्या मनाला दुखविण्याचे काम राजकीय वर्तुळातील राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने आता सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्ववभूमीवर भाजपाने संतप्त भूमिका घेतली असून भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी यावर वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले प्रसाद लाड? राष्ट्रवादीच्या कॅलेंडरमध्ये […]

राष्ट्रवादीच्या दिनदर्शिकेमध्ये विठ्ठलाच्या चेहऱ्यावर हिरवा चांद आणि बोकड

विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी पायी वारी करतात. विठुरायावरची श्रद्धा ते दिंडीतून व्यक्त करीत असतात. परंतु यातही अनेकांच्या मनाला दुखविण्याचे काम राजकीय वर्तुळातील राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने आता सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्ववभूमीवर भाजपाने संतप्त भूमिका घेतली असून भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले प्रसाद लाड?

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरमध्ये विठुमाऊलीच्या चेहऱ्यावर बोकड दाखवण्याचे काम या औरंग्याच्या औलादींनी केले आहे. लाखो करोडो वारकरी भक्तांचा हा अपमान आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा हिंदुत्त्वाचा अपमान आहे. मला खऱ्या पद्धतीने शरद पवारांना विचारायचं आहे. तुम्ही सर्व धर्म समभावातून हिंदुत्त्वाचा व वारकऱ्यांचा अपमान करू इच्छिता का? खरोखर राष्ट्रवादीने हे कृत्य केले असेल तर शरद पवारांनी माफी मागितली. पाहिजे, जयंत पाटलांनी माफी मागितली पाहिजे. वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, हिंदूत्वाची माफी मागितली पाहिजे. ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला तात्काळ पक्षातून निलंबित केले पाहिजे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number