राज्यपाल भगत सिंह कोश्यारी कोरोनाबाधित

देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बुधवारी मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात येत आहेत. विधानसभा परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना […]

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी कोरोनाबाधित

देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बुधवारी मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात येत आहेत.

विधानसभा परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदेंना साथ दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

बुधवारी सकाळी एकनाथ शिंदे आमदारांसह सूरत येथून गुवाहाटी येथे पोहचेले. यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही शिंदे यांची भेट घेतली. यावेळी माझा गट हीच खरी शिवसेना आहे, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला जाणार होते. मात्र, राज्यपाल कोरोनाबाधित असल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number