विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये वापरलेल्या भाषेवर राज्यपालांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेमुळे दुख असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल पदाचा अपमान या पत्रात केला आहे. बेकायदेशीर वाटणाऱ्या प्रक्रियेला संमती देण्यासाठी माझ्यवर दबाव आणला जाऊ शकत नाही, असे या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कायदे मंडळाने केलेल कायदे तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. नियमातील बदल हे कायदेशीर आहेत की नाही हे तपासण्यासाठी अनावश्यक वेळ घेऊ नये, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.