‘सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही’ – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करूनही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कामावर पुन्हा न परतलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तसेच यावर बोलताना ते म्हणाले, सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्याबाबत बैठकित निर्णय होऊ शकतो, असा इशारा मंत्री अनिल परब यांनी संपकारी […]

‘सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही’ – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करूनही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कामावर पुन्हा न परतलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तसेच यावर बोलताना ते म्हणाले, सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्याबाबत बैठकित निर्णय होऊ शकतो, असा इशारा मंत्री अनिल परब यांनी संपकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरी दोऱ्यावर आहेत. त्यामुळे पत्रकारांशी बोलताना त्यांनी संपकारी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. तसेच शुक्रवारी मुंबईत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी दिशाभूल करत असल्याची अप्रत्यक्ष टीका गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केली.

एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकारी कर्मचाऱ्यांना मेस्मातंर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच कर्मचारी विलिनीकरणावर ठाम असल्यामुळे ते म्हणाले, आमचे दायित्व जसे एसटी कर्मचाऱ्यांशी आहे तसे ते जनतेसोबतसुद्धा आहे. असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number