जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि कृती समितीनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. दरम्यान, एसटीचा संप चिघळणार, अशी चिन्हं आहेत.
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिलाय. ऐन दिवाळीत एसटीचा संप सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठीची आजची बैठकही निष्फळ ठरलीय.
मुंबई सेंट्रल एसटी महामंडळात नुकतीच परिवहन मंत्री दिवाकर रावते, परिवहन आयुक्त प्रविण गेडाम आणि एसटीचे अधिकारी यांची बैठक झाली. य़ा बैठकीतच सरकारनं हा इशारा दिलाय.