सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सरकारी कर्मचाऱ्यांची 30%  कपात करण्याचा राज्य सरकरने निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यातील 19 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.  सरकारी कर्मचारी पदी बहुतांश भागात रिक्त पद आहेत. क्लास 1 अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीपर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत विविध पदं निर्माण झाली आहेत आणि जनतेची सेवा करण्यासाठी ही पद निर्माण झाली आहेत. हीच पदं सरकारने […]

सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांची 30%  कपात करण्याचा राज्य सरकरने निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यातील 19 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.  सरकारी कर्मचारी पदी बहुतांश भागात रिक्त पद आहेत. क्लास 1 अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीपर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत विविध पदं निर्माण झाली आहेत आणि जनतेची सेवा करण्यासाठी ही पद निर्माण झाली आहेत. हीच पदं सरकारने कमी केली तर जनतेची सेवा होणार नाही. असे सरकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ग.दी.कुलथे यांनी सांगितले.

2016मध्ये याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कार्यान्वित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेले सातवे वेतनदेखील अद्याप मिळाले नाही. त्यासाठी, 30% कपातीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीसांकडे चर्चेची मागणी करण्यात आली आहे. असे देखील कुलथेंनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number