मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलातील येथे 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धक्कादायक घटना घडली. या पार्टीत मद्यसोबत ड्रग्सचे सेवनही मोठ्या प्रमाणात झाल्याचे उघडकीस आले आहे. या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या जमुनालाल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
नेस्कोतील वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टच रेट कार्ड समोर आले आहे. नेस्कोतील वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टच्या तिकीटांचे रेट आता तीन लाखांपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी स्टेज टेबलचा दर तब्बल 3 लाख रुपये इतका आहे तर तर व्हीआयपी टेबलचा दर एक लाख ते दीड लाखाच्या दरम्यान आहे. तसेच बॅकस्टेजचा दर 5,999 असून व्हिआयपी पासची किंमत अडीच हजारांपासून ते दहा हजारांच्या घरात होती. अवाच्या सव्वा दर असूनही कॉन्सर्टला तोबा गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- Goregaon Drugs Party : गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्स पार्टीप्रकरणी मोठी अपडेट! आरोपींची नावे समोर, इतक्या दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणातील नवीन अपडेट समोर
दरम्यान या ड्रग्स पार्टीला बॉलीवूडमधला प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ऑरी याने देखील हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोरेगाव नेस्को कॉन्सर्ट प्रकरणात ऑरी उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो नाचताना स्पष्ट दिसत आहे. ऑरीने याआधी देखील अशा अनेक पार्टीला आपली उपस्थिती दाखवली आहे. इतकचं नव्हे तर ऑरीवर ड्रग्स सेवनाचे आरोप देखील झाले आहेत. इन्फ्लुएन्सर ऑरीच्या उपस्थितीमुळे या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सध्या पोलीसांनी या पार्टीत उपस्थित असलेल्या इतर तरुणांच्या जबाब नोंदवण्यावर भर दिला असून तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा- Drugs Overdose : लाईव्ह कॉन्सर्टला ड्रग्जचा विळखा; भर कार्यक्रमात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
6 आरोपींची नाव समोर
तसेच गोरेगाव ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी असलेल्या 6 आरोपींना वनराई पोलिसांनी बोरिवली न्यायालयात हजर केले होते. जिथे त्यांना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सनी जैन, बालकृष्ण कुरूप,रौनक खंडेवाल,आनंद पटेल, प्रतीक पांडे, आकाश समल आहेत.