जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशातील महान समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांची आज 246 वी जयंती आहे. राजा राम मोहन रॉय यांच्या जयंती निमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून राजा राम मोहन रॉय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजा राम मोहन रॉय यांचा जन्म 22 मे, 1772 मध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिबाद जिल्ह्यातील राधानगर या गावात झाला होता.
राम मोहन यांचा जन्म हिन्दु ब्राम्हण समाजात झाला होता, मात्र तरीही ते लहानपणा पासूनचं हिन्दू रुढी, परंपरांपासून दूरच राहिले. राजा राम मोहन हे ब्राम्हण समाजाचे संस्थापक असून, त्यांनी हिन्दू समाजातील बाल विवाह, सती प्रथा आशा अनेक रुढी, परंपरांचा विरोध केला.
राम मोहन रॉय यांचा बाल विवाह, सती प्रथा या सामाजिक रुढी, परंपरांना विरोध होता, त्यांनी देशातील समाज सुधारणेसाठी संघर्ष केला, त्यांच्या याचं महान कार्याला लक्षात ठेवून गुगलने आजच्या दिवशी राजा राम मोहन रॉय यांना डुडलच्या माध्यमातून सन्मानित केलं आहे.