भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना गुगलकडून मानवंदना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज 148 वी जयंती आहे. दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त गुगलने डूडलद्वारे दादासाहेब फाळके यांना आदरांजली वाहिली आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल १८७० साली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये झाला. दादासाहेब फाळके यांच पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके, मात्र दादासाहेब फाळके हे दादासाहेब या नावानेच […]

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना गुगलकडून मानवंदना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज 148 वी जयंती आहे. दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त गुगलने डूडलद्वारे दादासाहेब फाळके यांना आदरांजली वाहिली आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल १८७० साली नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये झाला. दादासाहेब फाळके यांच पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके, मात्र दादासाहेब फाळके हे दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते.

दादासाहेब फाळके यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. दादासाहेब फाळके यांनी 1912 साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मूकपट प्रदर्शित केला. 1944 साली त्यांचं निधन झालं. दादासाहेब फाळके यांच भारतीय सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन 1969 साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ ‘दादा साहेब फाळके’ पुरस्काराची सुरुवात केली. हा पुरस्कार भारतीय सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित आणि सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. सर्वप्रथम देविका राणी चौधरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number