पुणे जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला उत्तम प्रतिसाद

पुणे जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत पाच हजार चारशे अर्ज मंजूर मुलीच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयाची रक्कम जमा.

पुणे जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला उत्तम प्रतिसाद

पुणे: पुणे जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकारने मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 7392 अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी 5400 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या खात्यात प्रत्येकी 5000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे. या कालावधीत एकूण 1,01,000 रुपयांची रक्कम मुलीच्या खात्यात जमा होईल. सुरुवातीला मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात आली. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात योजनेला काही काळासाठी ब्रेक लागला होता.

या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या भविष्यकालीन गरजांसाठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरली आहे. मुलींच्या शिक्षणावर भर देत त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने हे पाऊल उचलले आहे.दरम्यान, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. आतापर्यंत 7392 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 5400 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.

सरकारच्या या उपक्रमामुळे मुलगी जन्माला आली तरी ती कुटुंबासाठी आर्थिक ओझे न वाटता संपत्ती म्हणून पाहिली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number