गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर

कोकण, ६ जुलै २०२३, प्रतिनिधी: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई, नाशिक आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वेने ५२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी अनेकांनी गेल्या काही महिन्यांपासूनच बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. परंतु आता गाड्या वाढवण्यात आल्याने कोकणवासियांना सोयीस्कररीत्या घरी जाता येणार आहे. रेल्वेने गणपती […]

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर

कोकण, ६ जुलै २०२३, प्रतिनिधी: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई, नाशिक आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वेने ५२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी अनेकांनी गेल्या काही महिन्यांपासूनच बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. परंतु आता गाड्या वाढवण्यात आल्याने कोकणवासियांना सोयीस्कररीत्या घरी जाता येणार आहे. रेल्वेने गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यासाठी बुकिंगही सुरू झाल्या आहे. त्यानंतर आता चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने रेल्वे बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. दिवा- चिपळूण दरम्यान ३६ फेऱ्या आणि एलटीटी- मंगळूरू विशेष रेल्वेच्या १६ फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. दिवा- चिपळूण दरम्यान ३६ फेऱ्या आणि एलटीटी- मंगळूरू विशेष रेल्वेच्या १६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे.

त्यासाठी तीन जूलै पासून बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं आता गणेशोत्सवाच्या काळात कोकणात धावणाऱ्या रेल्वेंची संख्या २०७ वर पोहचली आहे. १३ ते १९ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबरपर्यंत रेल्वेच्या जास्त गाड्या धावणार आहे. त्यामुळं आता गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासियांना सुखरुप घरी जाता येणार आहे.

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे दिव्यातून संध्याकाळी ७.४५ मिनिटांनी सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १.२५ वाजता चिपळुणला पोहचणार आहे. गोरेगाव, वीर, करंजाडी, खेड, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव आणि अंजनी या ठिकाणी दिवा-चिपळूण मेमू रेल्वेचे थांबे असणार आहे. तर एलटीटी- मंगळूरू विशेष रेल्वे मुंबईतून रात्री १०.१५ वाजता सुटणार आहे. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी ५.४० वाजता मंगळुरुत पोहचणार आहे. तब्बल २० डब्यांची ही रेल्वेगाडी ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव, कारवार आणि मुरुडेश्वर या ठिकाणी एलटीटी- मंगळूरू रेल्वेला थांबे देण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number