Cashless Travel In Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! आता कंडक्टरची वाट पाहण्याची कटकट संपली; PMPML बसमध्ये सीटवरच मिळणार तिकीट

आता बसमध्ये तिकीट काढण्यासाठी तुम्हाला कंडक्टरला शोधण्याची किंवा गर्दीत रांगा लावण्याची गरज नाही.

Cashless Travel In Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! आता कंडक्टरची वाट पाहण्याची कटकट संपली; PMPML बसमध्ये सीटवरच मिळणार तिकीट

Cashless Travel In Pune: सार्वजनिक वाहतूक अधिक हायटेक करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) एक मोठे पाऊल उचलले आहे. आता बसमध्ये तिकीट काढण्यासाठी तुम्हाला कंडक्टरला शोधण्याची किंवा गर्दीत रांगा लावण्याची गरज नाही. प्रवाशांना त्यांच्या सीटवर बसूनच मोबाईलद्वारे तिकीट बुक करता येणार आहे. 'आपली पीएमपीएमएल' या ॲपच्या प्रचारासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हा डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

नेमकी कशी आहे ही सुविधा?
पीएमपी प्रशासनाने बसमधील प्रत्येक सीटच्या मागे खास QR कोड स्टिकर्स लावले आहेत. प्रवाशांनी आपल्या मोबाईलवरून हा कोड स्कॅन केल्यास ते थेट 'आपली पीएमपीएमएल' (Aapli PMPML) ॲपवर पोहोचतील. विशेषतः गर्दीच्या वेळी जेव्हा कंडक्टरला शेवटच्या प्रवाशापर्यंत पोहोचणे कठीण होते, अशा वेळी प्रवासी स्वतःहून डिजिटल तिकीट काढून आपला प्रवास वैध करू शकतात.

कुठे सुरू झाली सेवा?
प्राप्त माहितीनुसार, एकूण 927 बसेसमध्ये 28,305 क्यूआर कोड स्टिकर्स लावण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या खालील प्रमुख डेपोमधून सुटणाऱ्या बसेसमध्ये ही सुविधा कार्यान्वित झाली आहे. यात स्वारगेट, कात्रज आणि वाघोली, बाणेर, बालेवाडी आणि चाकण, हिंजवडी-मान, भेकराईनगर आणि शेवाळवाडी या भागांमध्ये धावणाऱ्या बसेचा समावेश आहे. तसेच उर्वरित मार्गांवरील बसेसमध्येही स्टिकर्स लावण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.

हेही वाचा – Avinash Jadhav On Gunaratna Sadavarte : सदावर्तेंची मराठी सक्तीवरून राज ठाकरेंवर टीका; अविनाश जाधव यांनी अमराठी रिक्षाचालकांसह सदावर्तेंना दिला सज्जड दम

डिजिटल प्रवासात 'ट्रॅकिंग'चे आव्हान
या नव्या सुविधेचे स्वागत होत असतानाच काही तांत्रिक समस्यांकडेही लक्ष वेधले जात आहे. पीएमपी पॅसेंजर फोरमचे मानद सचिव संजय शितोळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ॲपद्वारे तिकीट मिळणे सोयीचे आहे, मात्र बसचे लाईव्ह ट्रॅकिंग अजूनही अनेकदा निकामी असते. प्रवाशांना बसची अचूक वेळ कळावी यासाठी ॲपची गती आणि ट्रॅकिंग सिस्टीम सुधारणे गरजेचे आहे," असे त्यांनी नमूद केले. अनेक प्रवासी आजही जुन्या पद्धतीनेच तिकीट काढतात. या नव्या उपक्रमामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना डिजिटल पेमेंटची सवय लागेल आणि पीएमपीचा प्रवास अधिक आधुनिक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number