Holi Special Konkan Railway : चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळी उत्सवासाठी विशेष गाड्या; कोणत्या विभागातून किती ट्रेन सुटणार?

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने होळी सणानिमित्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Holi Special Konkan Railway : चाकरमान्यांसाठी खुशखबर! होळी उत्सवासाठी विशेष गाड्या; कोणत्या विभागातून किती ट्रेन सुटणार?

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने होळी सणानिमित्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने होळी सणानिमित्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आरक्षण वेळेत करण्याचे आवाहनही केले आहे. 

हेही वाचा- Mumbai-Pune Expressway Traffic : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीचं कोडं सुटेना, तिसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे…
मध्य रेल्वे देशभरातील विविध ठिकाणी 209 विशेष गाड्या चालवणार आहे जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत होळीचा सण साजरा करता येईल. या गाड्यांमध्ये वातानुकुलीत विशेष, वातानुकुलीत सह शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे कोचचे मिश्र संयोजन असलेल्या गाड्या आणि अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांमध्ये मुंबई – नागपूर – मुंबई, मुंबई – रत्नागिरी – मुंबई, मुंबई – चिपळूण – मुंबई आणि इतर ठिकाणांचा समावेश असेल.

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar : व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी; शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी देशभरात होळी उत्सवासाठी 1410 विशेष गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत करतील. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने प्रवासी सुविधा वाढवल्या आहेत आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी विविध स्थानकांवर पुरेशा संख्येने तिकीट काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांची सविस्तर माहिती लवकरच कळवली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number