Jalgaon Gold & Silver Rate : महागाईने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आंनदवार्ता! जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 3 हजारांची घसरण

सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे.

Jalgaon Gold & Silver Rate : महागाईने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आंनदवार्ता! जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 3 हजारांची घसरण

अमेरिका आणि इराण यांच्यातील भूराजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होते. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना सोने न खरेदी करण्याचे आवाहन केल्यानंतर जळगावच्या बाजारामध्ये सोने,चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होताना पहायला मिळाले. अशातच सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.

जळगावच्या बाजारात सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. जळगावच्या बाजारात आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार रुपये आहेत, तर जळगावच्या बाजारात चांदीचे दर जीएसटी सह दोन लाख 57 हजार रुपये इतके आहे. यावेळी सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार रुपयाची तर चांदीच्या दरात 13000 रुपयाची घसरण झाली आहे.

हेही वाचा- Onion Farmers : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! थेट बाजार समित्यांमधून होणार कांदा खरेदी

रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे सोने-चांदीच्या दरात ही घसरण महत्वाची मानले जात आहे. या दरवाढीच्या तडाख्यातून सुटल्यामुळे ग्राहक आणि बाजारपेठेतील गुंतवणूकदारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तर सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांसाठी ही खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे. आगामी काळातील सोने चांदीच्या दरात मोठी भाव वाढवण्याची शक्यता सराफा व्यवसायिकांनी आणि सोने तज्ञ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात दर आणखी किती कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number