वृत्तसंस्था, मुंबई
“बाहुबली”च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ‘बाहुबली-२’मधील महिष्मती राज्य तुम्ही फक्त चित्रपटात पाहिलं असेलं. मात्र आता महिष्मती राज्य पर्यटन स्थळ झालंय.
हैद्राबादेतील रामोजी फिल्म सिटीमध्ये हा सेट उभारण्यात आलाय. ‘बाहुबली-२’ चित्रपटातील महिष्मती राज्य पर्यटन स्थळ झाल्यामुळे चित्रपटात पाहिलेलं बाहुबलीचं सिंहासन आता तुम्ही कधीही प्रत्यक्ष पाहू शकणार आहात.
बाहुबलीचा सेट पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतेय. बाहुबलीच्या सेटला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे जेव्हा तुम्ही हैद्राबादला जाणार असाल तेव्हा महिष्मती राज्यात नक्कीच जाऊन या.