जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया
ऐन पावसाळ्यात गोंदिया जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. गोंदीया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील मनोरा गावात लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
गावातील विहीर, बोरवेल, सर्व कोरडे ठाक झाले आहेत. त्यामुळे मनोरा गावातील लोकांना शेजारील गावातून 1 किलोमीटर एवढी पायपीट करुन पिण्यासाठी पाणी आणावे लागतं आहे.
पाण्याच्या प्रत्येक घागरीसाठी 10 रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याची व्यवस्था न केल्यास गाव सोडण्याचा इशारा गोंदियातील मनोरा गावातील ग्रामस्थांनी दिला.