जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया
एकीकडे सीमेवरचे जवान दिवसरात्र देशासाठी प्राण पणाला लाऊन पाकिस्तान विरोधात लढतायंत. तर, दुसरीकडे देशातलेच काही समाजकंटक शहरात प्रांतवाद माजवण्याचं काम करतायंत.
गोंदिया शहरात नवरात्रोत्सवादरम्यान आय लव्ह यू पाकिस्तान असं छापलेले फुगे आढळलेत.
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना लहान मुलांकडे हे फुगे आढळून आले. त्या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फुगे विकणाऱ्या लहान मुलांची चौकशी करुन त्यांना सोडून दिले.
तसेच या फुग्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही चौकशी करण्यात असून असा प्रकार परत घडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.