24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा

सर्पदंशानं मृत्यू पावलेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करत थेट रचलेल्या चितेवरुन घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार गोदिंयामध्ये घडला आहे. गोरेगाव तालुक्यातल्या घाटी गावात हा प्रकार उघडकीस आला आहे, आदित्य गौतम असं सर्पदंशानं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. जिल्हा रुग्णालयाकडून त्याला मृत घोषित करण्यात आलं, अंत्यविधीसाठी नेले असता बालाघाट येथील आर्युर्वेदिक डॉक्टर नवीन मोहनसिंग लिल्हारे यांनी थेट […]

24 तास द्या मृत मुलाला जिवंत करतो, गोदिंयातील डॉक्टराचा दावा

सर्पदंशानं मृत्यू पावलेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करत थेट रचलेल्या चितेवरुन घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार गोदिंयामध्ये घडला आहे.

गोरेगाव तालुक्यातल्या घाटी गावात हा प्रकार उघडकीस आला आहे, आदित्य गौतम असं सर्पदंशानं मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे.

जिल्हा रुग्णालयाकडून त्याला मृत घोषित करण्यात आलं, अंत्यविधीसाठी नेले असता बालाघाट येथील आर्युर्वेदिक डॉक्टर नवीन मोहनसिंग लिल्हारे यांनी थेट स्मशानभूमी गाठली आणि 24 तासात मुलाला जिवंत करेन असा दावा त्यांनी केला.

आदित्यचं शव घरी परत आणल्यानंतर पोलिसांकडून परवानगी मागण्यासाठी ते गेले यावेळी पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली, या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मोर्चा काढला.

नेमकं प्रकरण काय आहे

  • सर्पदंशाने मृत पावलेल्या 8 वर्षीय मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा दावा
  • जिल्हा रुग्णालयाकडून त्याला मृत घोषित करण्यात आले होते
  • मात्र अत्यंविधि होत असताना बालाघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन मोहनसिंग लिल्हारे यांनी थेट स्मशानभूमी गाठून आदित्य मृत झाला नसल्याचे सांगितले व उपचाराकरीता 24 तास दिले तर त्याला जिवंत करण्याचा दावा केला
  • त्यानंतर आदित्य याचा शव पुन्हा घरी परत आणुन पुढील उपचाराकरीता रात्री उशिरा परत येईन असे सांगितले
  • मात्र सदर डॉक्टर रात्री परत आले व पोलिसांना याची परवानगी मागण्या साठी गेले असता पोलिसांनी डॉक्टर व त्यांच्या सहकार्याला अटक केले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number