Gondia Crime : धक्कादायक! अल्पवयीन मुलीची प्रसूती, बाळाची केली थेट विक्री; डॉक्टरवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

वजात बाळाची भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केली होता. 

Gondia Crime : धक्कादायक! अल्पवयीन मुलीची प्रसूती, बाळाची केली थेट विक्री; डॉक्टरवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

राज्यभरात सध्या गुन्ह्यांमध्ये मोठ्य प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पैशासाठी आज माणूस कोणत्याही थराला पोहोचला आहे. असाच एक प्रकार गोंदिया येथे घडला आहे. गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळाची भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केली होता. 

हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली. या प्रकरणात अधिक तपास केला असताना आणखी एक बाळ डॉक्टरने विक्री केला असल्याचं उघड झालं. त्या बाळाची आई ही अल्पवयीन मुलगी होती. पीडित मुलगी परराज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया येथे आली होती. 

हेही वाचा – Farmer Loan Waiver Update : ‘या’ बँकेतील शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

सदर मुलगी प्रसूतीसाठी बालाजी हॉस्पिटल येते आली असताना डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी याची माहिती पोलिसांना न देता प्रसूती करून बाळ परस्पर विक्री केले. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी गोंदिया येथील रामनगर पोलिस स्टेशन मध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे डॉक्टर नितेश वाजपेयी यांचे पाय आणखी खोलात जात असल्याचं दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number