Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

काय आहेत आजचे सोन्याचे दर?

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे दर

आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. एमसीएक्सवर सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात सुमारे 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची वाढ झाली. 5 मे डिलिव्हरीसाठीची चांदी मागील सत्रात 2,51,742 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती आणि आज 2,55,500 रुपयांवर उघडली. सकाळच्या सत्रात त्यात 3,993 रुपयांची वाढ होऊन ती 2,55,735  रुपयांवर पोहोचली. सकाळी 10 वाजता, सोन्याचा भाव 2,989 रुपयांनी,1.19 टक्क्यांनी वाढून 2,54,731  रुपयांवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात, तो 861 रुपयांनी वाढून 1,54,809  रुपयांवर पोहोचला. सकाळी 10 वाजता, सोन्याचा भाव 675 रुपयांनी वाढून 1,54,623  रुपयांवर व्यवहार करत होता.

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 'गुड रिटर्न्स'नुसार, 24-कॅरेट सोन्याचा भाव 1,55,570  रूपये असून, त्यात 220 रूपयांची वाढ झाली आहे. 22-कॅरेट सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ झाली असून, त्याचा भाव 1,42,600 रूपये आहे. 18-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,16,680 रूपये असून, त्यात 170 रूपयांची ची वाढ झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो 2,70,000 रूपये असून, त्यात 1000 रूपयांची वाढ झाली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या आधी सराफ आणि स्टॉकिस्ट्सनी केलेल्या नवीन खरेदीमुळे सोने आणि चांदीच्या दरांना आधार मिळाला. मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी अक्षय तृतीया हा एक शुभ दिवस मानला जातो. यावर्षी अक्षय्य तृतीया 19 एप्रिल रोजी आहे. शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र लिमिटेडचे ​​सीएमडी, चेतन थडेश्वर म्हणाले, "अक्षय्य तृतीया हा दागिने उद्योगासाठी सर्वात महत्त्वाच्या काळांपैकी एक आहे. हा काळ परंपरा आणि सोन्याशी निगडित मूल्यामुळे चालतो."

मुंबई              155570 रुपये    142600  रुपये    116680  रुपये

 दिल्‍ली           155720  रुपये    142750  रुपये    116830  रुपये

कोलकाता    155570  रुपये    142600  रुपये    116680 रुपये

चेन्‍नई    156230  रुपये    143100  रुपये    119410  रुपये

लखनऊ    155720  रुपये    142750  रुपये    116830  रुपये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number