Gold Silver Rate Today: खूशखबर! सोन्याच्या किंमतीमध्ये घट, पण चांदी मात्र वधारली; 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचे आजचे भाव जाणून घ्या

जागतिक बाजारात नफावसुलीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून देशांतर्गत बाजारात मर्यादित तेजी दिसते आहे.

Gold Silver Rate Today: खूशखबर! सोन्याच्या किंमतीमध्ये घट, पण चांदी मात्र वधारली; 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचे आजचे भाव जाणून घ्या

जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. नफावसुलीमुळे (profit booking) आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने दबावाखाली ट्रेड होत आहे. COMEX वर सोन्याचा भाव 0.30 टक्के किंवा 13.80 डॉलरने घसरून 4,538.90 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला. तर Gold Spot किंमत 0.41 टक्के किंवा 18.38 डॉलरची घट होऊन 4,514.83 डॉलर प्रति औंस झाली आहे. विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याने ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, देशांतर्गत वायदे बाजारात (Domestic Futures Market) सोमवारी सकाळी सोन्यात मर्यादित तेजी दिसून आली. MCX वर सोन्याचा भाव 0.27 टक्के किंवा 375 रुपयांच्या वाढीसह 1,40,248 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर ट्रेड होताना दिसला. मात्र जागतिक बाजारातील कमजोरीचा परिणाम पुढील व्यवहारात देशांतर्गत किमतींवरही जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोन्याच्या तुलनेत चांदीने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. देशांतर्गत वायदा बाजारात चांदीने इतिहास रचला आहे. MCX (Multi Commodity Exchange) वर सोमवारी प्रथमच चांदीचा भाव 2.5 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करत नवा उच्चांक गाठला. मार्च 2026 वैधता असलेल्या चांदीच्या फ्युचर्समध्ये तब्बल 5 टक्क्यांहून अधिक उसळी दिसून आली असून, भाव 2,54,174 रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत पोहोचला, अशी माहिती MCX च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

ही जोरदार तेजी केवळ देशांतर्गत बाजारापुरती मर्यादित राहिलेली नाही. जागतिक बाजारातही चांदीने नवा विक्रम केला आहे. Spot Silver ने पहिल्यांदाच 80 डॉलर प्रति औंसचा स्तर ओलांडला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीबाबत गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: Maharashtra Election 2026 : मोठी बातमी; काका-पुतणे पुन्हा एकत्र, पुण्यात युती; जागावाटपही ठरलं

विशेष म्हणजे, 2025 या वर्षात आतापर्यंत चांदीने सुमारे 181 टक्क्यांचा परतावा दिला असून, ती या वर्षातील सर्वाधिक परतावा देणारी गुंतवणूक (Asset) ठरली आहे. चांदीचे एकूण Market Capitalisation 4.65 ट्रिलियन डॉलर इतके झाले असून, ते जगातील सर्वात मोठ्या कंपनी NVIDIA (4.63 ट्रिलियन डॉलर) पेक्षाही जास्त आहे, ही बाब गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे.

जागतिक बाजारातही चांदीची तेजी कायम आहे. COMEX वर चांदीचा भाव 3.30 टक्के किंवा 2.54 डॉलरने वाढून 79.74 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर Silver Spot किंमतही 0.72 टक्के किंवा 0.57 डॉलरच्या वाढीसह 79.84 डॉलर प्रति औंस या पातळीवर ट्रेड होत आहे.

एकूणच, सोन्यात सध्या मर्यादित दबाव दिसत असला तरी चांदीने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा देत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, आणि आगामी काळातही तिच्या किमतींमध्ये चढ-उतारासह तेजी कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: BMC Election 2026: उद्धव ठाकरेंसमोरच बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी; महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात पेच, नेमकं काय आहे प्रकरण?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number