Gold Silver Rates: सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ, चांदी आठ हजार रुपयांनी महाग; आजचे ताजे भाव जाणून घ्या

दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने सोने-चांदीच्या मागणीत वाढ होत असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Gold Silver Rates: सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ, चांदी आठ हजार रुपयांनी महाग; आजचे ताजे भाव जाणून घ्या

मुंबई: सराफा बाजारात 28 फेब्रुवारी 2026 रोजी देशांतर्गत सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली. स्पॉट मार्केटमधील वाढती मागणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे.

आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 1000 रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात तब्बल 8000 रुपयांची उसळी नोंदविण्यात आली. जीएसटीसह सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1 लाख 63 हजार 770 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर गेला आहे.

हेही वाचा: INS Anjadip: शत्रूच्या पाणबुड्यांचा कर्दनकाळ! ‘INS अंजदीप’ भारतीय नौदलात सामील, काय आहेत खास वैशिष्ट्ये? वाचा

दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने सोने-चांदीच्या मागणीत वाढ होत असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

भारतातील सोन्याचे दर मुख्यतः आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती, आयात शुल्क, कर रचना तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार यावर अवलंबून असतात. रुपयातील कमजोरी किंवा मजबुतीमुळेही सोन्याच्या किमतींमध्ये दररोज किरकोळ बदल दिसून येतात.

भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून सांस्कृतिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः विवाहसोहळे आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे बाजारातील बदलत्या परिस्थितीवर गुंतवणूकदार आणि व्यापारी बारकाईने लक्ष ठेवून असून, योग्य आर्थिक निर्णयांसाठी अद्ययावत दरांची माहिती महत्त्वाची ठरत आहे.

हेही वाचा: Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मोठा मेगा ब्लॉक, विद्याविहार ते…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number