Gold Silver Rate 2026: 2025 चा विक्रम 2026 मध्ये मोडणार? सोने-चांदीच्या किमतींबाबत ‘हा’ धक्कादायक अहवाल आला समोर, वाचा सविस्तर

तज्ज्ञांच्या मते 2026 मध्येही ही तेजी कायम राहण्याची शक्यता असून एसआयपीद्वारे गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

Gold Silver Rate 2026: 2025 चा विक्रम 2026 मध्ये मोडणार? सोने-चांदीच्या किमतींबाबत ‘हा’ धक्कादायक अहवाल आला समोर, वाचा सविस्तर

मुंबई: जर तुम्ही वर्षभरापूर्वी सोन्यामध्ये किंवा चांदीत गुंतवणूक केली असेल, तर आज तुमचा खिसा नक्कीच 'गोल्डन' झाला असेल! 2025 हे वर्ष मौल्यवान धातूंसाठी केवळ दरवाढीचे नाही, तर नफ्याच्या विक्रमांचे वर्ष ठरले आहे. अवघ्या एका वर्षात चांदीने 144 टक्के गगनभरारी घेत 2.25 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे, तर सोन्याने 73 टक्के वाढीसह गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या ऐतिहासिक तेजीमुळे आता सामान्य ग्राहकांसह मोठे गुंतवणूकदारही “आणखी किती भाव वाढणार?” याकडे डोळे लावून बसले आहेत.

बाजारातील जाणकारांच्या मते, 2025 मध्ये सुरू झालेली ही ‘सोनेरी’ धाव 2026 मध्येही थांबण्याची चिन्हे नाहीत. आयबीजेएचे (IBJA) अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काळात सोन्याचे दर 1.50 लाख ते 1.65 लाख रुपयांपर्यंत, तर चांदी चक्क 2.50 लाख रुपयांपर्यंत झेप घेऊ शकते.

जागतिक स्तरावर केंद्रीय बँकांकडून होणारी सोन्याची मोठी खरेदी आणि कारखान्यांमध्ये वाढलेला चांदीचा वापर, या दोन प्रमुख कारणांमुळे दरांना नवी धार मिळत आहे. जरी वाढीचा वेग थोडा कमी झाला, तरी मार्केटमध्ये तेजीच राहणार असल्याचे संकेत आनंद राठी स्टॉक ब्रोकर्सचे संचालक नवीन माथूर यांनी दिले आहेत.

हेही वाचा: Vaibhav Suryavanshi : क्रिकेट विश्वात भारताच्या लेकाचा डंका ! 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा 'या' पुरस्काराने गौरव

गुंतवणूकदारांसाठी आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की, अशा चढ्या दरात पैसे गुंतवावेत का? यावर तज्ज्ञांनी ‘एसआयपी’ (SIP) चा मोलाचा सल्ला दिला आहे. सोन्यात दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे पोर्टफोलिओला स्थिरता मिळते, तर चांदीतील दरवाढीमुळे नफा कमावण्याची मोठी संधी आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चांदीच्या दरात वेगाने चढ-उतार होत असल्याने ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करणे हाच सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे दर थोडे कमी झाल्यावर किंवा टप्प्याटप्प्याने खरेदी करणे ग्राहकांसाठी हिताचे ठरेल.

एकूणच, सोन्याची झळाळी आणि चांदीची भरारी पाहता, 2026 हे वर्ष देखील गुंतवणुकीसाठी ‘लकी’ ठरू शकते. दागिन्यांच्या शौकीन ग्राहकांसाठी जरी खिसा थोडा रिकामा होणार असला, तरी भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करता सोने-चांदीतील गुंतवणूक आजही ‘सोन्याहून पिवळी’ ठरत आहे. त्यामुळे, जर तुम्ही अद्याप विचार करत असाल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने या मौल्यवान धातूंच्या खरेदी करण्यात सामील होणे फायद्याचे ठरू शकते.

हेही वाचा: Surat Man Slip Incident: देव तारी त्याला कोण मारी! 10 व्या मजल्यावरून पडला, पण आठव्या मजल्याच्या ग्रीलमध्ये पाय अडकला अन्…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number