Gold Rate Today: दागिन्यांची खरेदी करायची आहे? तर पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

मुंबई: सध्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांत सोन्याचे दर सतत वाढत होते, ज्याचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसला. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणं महागडं झालं होतं. मात्र, आज शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घट झालेली आहे. चांदीच्या किमतीतही सौम्य बदल झाले आहेत. […]

Gold Rate Today: दागिन्यांची खरेदी करायची आहे? तर पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

मुंबई: सध्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांत सोन्याचे दर सतत वाढत होते, ज्याचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसला. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात या दरवाढीमुळे दागिने खरेदी करणं महागडं झालं होतं. मात्र, आज शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घट झालेली आहे. चांदीच्या किमतीतही सौम्य बदल झाले आहेत. चला, तर मग पाहूया आजचे देशभरातील अपडेट्स…

बुलियन मार्केटच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹95,270 आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹87,331 इतका नोंदवण्यात आला आहे. तसेच 1 किलो चांदीसाठी ₹96,680 एवढा दर आहे, तर 10 ग्रॅम चांदीची किंमत ₹967 आहे. यावर स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेस मुळे दागिन्यांच्या अंतिम किमतीत थोडाफार फरक पडतो. त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक बाजारातील दर नक्की तपासा.

तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदी दर
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹87,166 आहे आणि 24 कॅरेटसाठी ₹95,090 आहे. पुणे, नागपूर आणि नाशिकमध्येही हाच दर कायम असून, 22 कॅरेट सोन्यासाठी ₹87,166 आणि 24 कॅरेटसाठी ₹95,090 आकारण्यात येत आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना सध्याच्या दरात दागिने खरेदी करायचे असतील, त्यांच्यासाठी ही थोडीशी दिलासा देणारी संधी आहे. 

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number