Gold-Silver Rate Today : सोन्याच्या दरात तेजी कायम; चांदीच्या दरातही उसळी, जाणून घ्या आजचे दर

जागतिक तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Gold-Silver Rate Today : सोन्याच्या दरात तेजी कायम; चांदीच्या दरातही उसळी,  जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील तणावपूर्ण युद्धपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी चढ-उतार सुरू आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरमधील कमकुवतपणा आणि गुंतवणूकदारांची सुरक्षित पर्यायांकडे वाढती ओढ यामुळे सोन्याला पुन्हा मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळेच आजच्या घडीला सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांकाच्या दिशेने झेप घेतली आहे.

अखिल भारतीय सराफा संघच्या माहितीनुसार, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसह) इतका झाला आहे. मागील व्यवहारात हा दर 1,51,500 रुपये होता, म्हणजेच एका दिवसात तब्बल 2,300 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमागे जागतिक बाजारातील तेजी आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी हे मुख्य कारण मानले जात आहे.

दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर देखील सोन्याच्या वायदा दरात वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोन्याचा वायदा भाव 119 रुपयांनी वाढून 1,50,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. यापूर्वी तो 1,49,981 रुपये होता. विशेष म्हणजे, याच वर्षी 29 जानेवारी 2026 रोजी सोन्याने 1,80,779 रुपये प्रति 10 ग्रॅम असा विक्रमी उच्चांक गाठला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किमतीत तेजी कायम आहे. जागतिक बाजारात हाजिर सोने 4,682.80 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले आहे. याचबरोबर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 1,48,899 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. विविध प्लॅटफॉर्मनुसार दरात किंचित फरक दिसत असला तरी एकूण कल वाढीचाच आहे.

हेही वाचा: Mumbai Metro: अंधेरी ते थेट काशीगाव… प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'मेट्रो 9' चे भव्य उद्घाटन; वाचा संपूर्ण टाईमटेबल

देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे दर जवळपास समान पातळीवर आहेत. पुणे, मुंबई, कोलकाता, हैदराबाद या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,50,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोने 1,38,100 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,12,990 रुपयांच्या आसपास आहे. चेन्नईमध्ये मात्र दर थोडे अधिक असून 24 कॅरेट सोने 1,52,620 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले आहे.

चांदीच्या दरात मात्र किरकोळ घसरण दिसून आली आहे. देशभरात 999 शुद्धतेच्या चांदीचा सरासरी दर 249.90 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 2,49,900 रुपये प्रति किलो इतका आहे. काही शहरांमध्ये दर स्थिर आहेत, तर चेन्नई आणि हैदराबादमध्ये चांदीचे दर 2,60,100 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. ही किंमत जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वगळून आहे.

एकूणच, जागतिक तणाव आणि आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून समोर येत आहे. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोन्याच्या किमती अवलंबून राहणार असून, गुंतवणूकदारांनी सावध आणि अभ्यासपूर्वक निर्णय घेणे गरजेचे ठरणार आहे. 

हेही वाचा: Custodial Death Case: अखेर 'त्या' पिता-पुत्रांना न्याय मिळाला! कोठडीत जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना मिळाली फाशीची शिक्षा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number