Gold-Silver Rate : दोन दिवसांच्या दरवाढीनंतर सोनं पुन्हा स्वस्त; चांदीच्या दरात काय बदल? जाणून घ्या

आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या भावात सौम्य घट नोंदवली गेली असून 18, 22 आणि 24 कॅरेट सोनं थोडं स्वस्त झालं आहे.

Gold-Silver Rate : दोन दिवसांच्या दरवाढीनंतर सोनं पुन्हा स्वस्त; चांदीच्या दरात काय बदल? जाणून घ्या

Gold-Silver Rate: सोनं खरेदी करायची इच्छा असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्साह वाढवणारा ठरू शकतो. कारण सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावांमध्ये हलकी घसरण नोंदवली गेली आहे. विकेंड असल्यामुळे ग्राहकांची शॉपिंग मूडमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता सराफ बाजारात व्यक्त केली जात आहे. त्यात सौम्य प्राईस करेक्शनमुळे ‘ईव्हन स्मॉल सेगमेंट बायिंग’ फायदेशीर दिसणार आहे. चांदीच्या बाबतीत मात्र आज काहीही बदल नोंदवले गेले नाहीत.

गुड रिटर्न्ससारख्या रेट मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म्सनुसार आज 24 कॅरेट सोनं एका तोळ्यावर 10 रुपयांनी स्वस्त झालं आहे. नवीन अपडेट केलेल्या भावानुसार 24 कॅरेटच्या एका तोळ्याची किंमत आता 1,22,010 इतकी आहे (काल 1,22,020). तर 10 तोळ्याच्या भावातही 100 रुपयांची घसरण नोंदवली गेली असून आज 12,20,100 रुपये इतकी किंमत दाखवली जात आहे. हाय-प्युअरिटी बिस्किट/बार खरेदी करणाऱ्यांसाठीही ही किंमत अप्रूव्ह झाली आहे.

हेही वाचा: Amitabh Bachchan: मुंबईत बिग बींची करोडोंची रिअल इस्टेट डील! दोन आलिशान फ्लॅट्स विक्रीतून मिळाला भन्नाट नफा; किती कोटींचा फायदा झाला?
 

22 कॅरेट सोन्याचे आजचे दरही कमी नोंदवले गेले. एका तोळ्याची किंमत आज 1,11,840 रुपये इतकी आहे. काल म्हणजे शुक्रवार या दरात 1,11,850 रुपये इतकी किंमत होती. 10 तोळ्यावर 100 रुपयांची घसरण झाली असून 11,18,400 रुपये इतकी रक्कम आज देावी लागणार आहे. पारंपरिक दागिन्यांच्या बहुतेक ब्रँड्स या कॅरेटमध्येच विक्री करतात. त्यामुळे घरगुती खरेदीदारांसाठी हा रेट पॉईंट विशेष महत्वाचा मानला जातो.

18 कॅरेटमध्येही आज सौम्य घट दिसली. एका तोळ्यावर 10 रुपयांची घसरण दिसून आली असून आज या कॅरेटमध्ये 91,510 रुपये इतका भाव दाखवला गेला आहे. काल 91,520 रुपये इतका होता. 10 तोळ्याची किंमत आज 9,15,100 रुपये नोंदली गेली आहे. डायमंड सेगमेंट, ब्रायडल मॉडर्न सेट आणि इंटरनॅशनल फिनिश्ड ज्वेलरी बहुतेक 18 कॅरेटमध्येच तयार होते.

हेही वाचा: RBI Restrictions: आरबीआयचे कठोर निर्बंध! महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचे व्यवहार मर्यादित; ठेवीदारांना फक्त एवढेच रुपये काढण्याची परवानगी

याउलट चांदी बाबतीत आज ‘नो चेंज’चं चित्र दिसलं. एका ग्रॅमची किंमत 152.50 इतकीच कायम आहे. तर एका किलोची किंमत 1,52,500 रुपये इतकीच आहे. म्हणजे सोन्यात  सूक्ष्म घसरण आणि चांदी स्थिर आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number