Todays Gold-Silver Rate : युद्धामधील सीजफायर तुटल्याने निर्माण झालेली अनिश्चिततेचा सोने चांदीत परीणाम; चांदी 4 हजारांनी घसरली तर सोने…

आखाती देशांतील युद्धस्थितीमुळे काही दिवसांपूर्वी उसळी घेतलेल्या सोनं-चांदीच्या दरात आता घसरण दिसून येत आहे.

Todays Gold-Silver Rate : युद्धामधील सीजफायर तुटल्याने निर्माण झालेली अनिश्चिततेचा सोने चांदीत परीणाम; चांदी 4 हजारांनी घसरली तर सोने…

आखाती देशांतील युद्धस्थितीमुळे काही दिवसांपूर्वी उसळी घेतलेल्या सोनं-चांदीच्या दरात आता घसरण दिसून येत आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची घट झाली असून चांदीचा दरही 4 हजार रुपयांनी खाली आला आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे युद्धामधील सीजफायर (शांतता करार) तुटल्याने निर्माण झालेली अनिश्चितता आहे.

मागील काही दिवसांपासून सीजफायरमुळे बाजारात स्थैर्य येईल, या अपेक्षेने सोन्या-चांदीचे दर वाढले होते. मात्र, आता पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे बाजारात सतत चढ-उतार सुरू आहेत.

आजचे दर पाहता, सोन्याचा भाव 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 48 हजार रुपयांवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धस्थिती लक्षात घेता आगामी काळातही सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number