जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दूध खरेदी दरात वाढ न करणं गोकुळच्या संचालकांना चांगलंच भोवलंय. गोकुळचं संचालक मंडळ बरखास्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. विभागीय उपनिबंधकानं या नोटीस दिल्या आहेत.
अध्यक्षांसह 17 संचालकांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गाय आणि म्हशीच्या दरात सरकारनं 3 रुपयांची वाढ सांगितली होती. मात्र गोकुळनं दूधदराता वाढ केली नाही.
त्यामुळे याबाबत नोटीस बजावत 2 मेपर्यंत म्हणणं सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत.