स्वयंघोषित संत रामपालला 2 हत्या प्रकरणांमध्ये आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आज दुपारी हिसारच्या विशेष न्यायालयाने रामपालला शिक्षा सुनावली आहे, रामपालवर 4 महिला आणि एका मुलाच्या हत्येचा आरोप होता.
या प्रकरणाबाबत त्याला न्यायालयाने 11ऑक्टोबरला रामपालला दोषी ठरवण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला आज शिक्षा सुनावण्यात आली.
रामपालसह त्याच्या एकूण 26 अनुयायांनादेखील दोषी ठरवण्यात आले होते.