आजपासून तुळजा भवानीच्या मोहनिद्रेला प्रारंभ होत आहे.
तुळजापूर शहर आणि परिसरातील महिला या तुळजा भवानीच्या गादीचा कापूस पिंजून नवीन गादी बनवतात. चांदीच्या पलंगावर देवीला झोपवले जाते. पिंजारी मुस्लीम समाजातील नम्मु बाशुमिया नदाफ उर्फ पिंजारी यांची 11 वी पिढी भवानी मातेच्या मोह निद्रेसंदर्भातील ही सेवा बजावत आहे, तर भावसार समाजातील लोक गादी बनवतात.
काय आहे तुळजा भवानीची मोह निद्रा ?
तुळजा भवानीच्या एकूण 3 निद्रा आहेत.
भवानी माता एकूण 21 दिवस निद्रेत असते.
त्यापैकी भाद्रपद कृष्ण आष्टमी ते आश्विन शुद्धप्रतिपदा या निद्रेला ‘मोह निद्रा’ असे म्हटलं जातं.
त्यानंतर आश्विन शुध्द दशमी (दसरा) ते आश्विन शुध्द प्रतिपदा या निद्रेला ‘श्रम निद्रा’ म्हटलं जातं
मार्गशीर्ष आमवस्येच्या रात्रीपासून ते पौष शुक्ल आष्टमीच्या पहाटेपर्यंत तिसरी निद्रा होते. या निद्रेला ‘घोर निद्रा’ असे म्हटले जाते.
या दरम्यानच्या काळात ब्राम्हण तांबोळी खाटिक धनगर मातंग न्हावी मराठा गोंधळी इतर समाजाला मोठा मान असतो. हे समाज तुळजा भवानी संस्थानाकडून फक्त नारळ व बिदागी घेतात आणि आपली सेवा बजावतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अखंडपणे सुरू आहे.