मुंबईच्या वडापावचा जागतिक सन्मान

मुंबईकर माणसाला वडा पाव आवडत नाही, असा माणूस मिळणे विरळाच. कारण, मुंबई आणि वडा पाव यांचं एक खास नातं आहे. कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा मुंबईकर वडा पाव खाऊ शकतो. बाहेरचा माणूस मुंबईत आला की, सुरुवातीच्या काळात वडा पाव हाच त्याचा आधार असतो. या वडापाव संदर्भात मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब समोर आली आहे. मुंबईचा आवडता […]

मुंबईच्या वडापावचा जागतिक सन्मान

मुंबईकर माणसाला वडा पाव आवडत नाही, असा माणूस मिळणे विरळाच. कारण, मुंबई आणि वडा पाव यांचं एक खास नातं आहे. कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा मुंबईकर वडा पाव खाऊ शकतो. बाहेरचा माणूस मुंबईत आला की, सुरुवातीच्या काळात वडा पाव हाच त्याचा आधार असतो. या वडापाव संदर्भात मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब समोर आली आहे. मुंबईचा आवडता पदार्थ समजल्या जाणाऱ्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे.
जगभरातील पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी ‘टेस्ट ऍटलास’ नामक वेबसाईटवर ‘जगभरातील सर्वोत्तम ५० सँडविच’ची यादी प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये वडापावला स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये मुंबईतील वडा पाव १३ व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये तुर्कीचा टॉम्बिक प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील पेरूचा बुटीफारा तर तिसऱ्या क्रमांकावर अर्जेंटिनाचे डी लोमो हे सँडविच आहे. या यादीमध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविचचा समावेश आहे. ज्यातील एक आहे अवाकाडो टोस्ट आणि दुसरा म्हणजे वडापाव.
साधारण १९६० आणि १९७० च्या दशकात दादर स्टेशनजवळ काम करणार्‍या अशोक वैद्य नावाच्या रस्त्यावरील विक्रेत्याने वडा पावचा शोध लावला. फक्त बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून त्याचा बटाटावडा बनवण्यात आला. पोळीला पर्याय म्हणून पाव वापरला गेला. याच पावात चटकदार चटणी, लसणाची सुकी चटणी, बेसनाचा चुरा असे टाकून देण्यात येऊ लागले.
मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील गिरणी कामगार आणि वडापाव यांचाही खास संबंध आहे. १९७० ते ८० च्या काळात मुंबईमध्ये गिरण्या बंद पडल्यावर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या होत्या.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number