Girl Reel In IPL: रील बनवणं पडलं 70 हजारांना! मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये एका तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार; पाहा नेमकं काय झालं?

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Girl Reel In IPL: रील बनवणं पडलं 70 हजारांना! मुल्लांपूरच्या स्टेडियममध्ये एका तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार; पाहा नेमकं काय झालं?

पंजाब: पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 11 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सामन्यानंतर एक तरुणीला रील बनवणे चांगलेच महागात पडले. मुल्लांपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह पीसीए स्टेडियममध्ये हा प्रकार घडला. सामना संपल्यानंतर महिला स्टेडियममध्ये बसून सोशल मीडियासाठी रील शूट करत होती.

रीलमध्ये ट्रेंडनुसार तिला अंगठी हवेत उडवल्यासारखे दाखवायचे होते. मात्र अभिनय करताना तिच्या हातातून अंगठी खरोखरच निसटली आणि स्टेडियममध्ये कुठेतरी पडली.

अंगठी पडताच या तरुणीने तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. तिच्यासोबत असलेले इतर लोकही सीटखाली आणि आसपासच्या भागात अंगठी शोधताना दिसले.

हेही वाचा: Sahar Shaikh: सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात? गाझियाबादच्या रहिवासी, शासनाची फसवणूक, बनावट जात प्रमाणपत्र…; नेमकं प्रकरण काय?

ही संपूर्ण घटना तिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. व्हिडिओमध्ये ती आणि तिचे मित्र स्टेडियममध्ये हरवलेली अंगठी शोधताना दिसत आहेत.

तरुणीने व्हिडिओसोबत लिहिले की, “70 हजार रुपयांचे नुकसान झाले. अंगठी अजूनही सापडलेली नाही. जर महाराजा यादविंद्र सिंह पीसीए स्टेडियममधील कोणीतरी हा व्हिडिओ पाहत असेल, तर कृपया आमची अंगठी शोधून परत द्या.”

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी रील बनवताना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. सोशल मीडियासाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याच्या नादात कधी कधी छोटासा निष्काळजीपणा मोठे नुकसान करून जाऊ शकतो, याचे हे एक उदाहरण ठरू शकते.

हेही वाचा: Amravati Paratwada Crime: अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या अमरावतीच्या नराधमाचं घर जमीनदोस्त; प्रशासनाने घरावर चालवला ‘बुलडोझर’ 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number