जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
साकीनाका पोलिस स्टेशनच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी एका मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सीसीटीव्हीच्या मदतीने हा छडा लावला आहे. साकीनाका भागातील एका दुकानाच्या बाहेर चिमुरडी खेळत होती त्याच वेळी आरोपी संदीप परबने शिरीण फातिमा या अडीच वर्षीय मुलीला उचलून घेऊन गेला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याच सीसीटीव्हीच्या साह्याने काही तासांतच आरोपीला अटक केली तर शिरीणला कुर्ला येथे सोडून देण्यात आले होते. तेथून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या हवाली केले.