जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा
भंडारा जिल्ह्यातल्या नागझिरा अभयारण्यात एका रणरागिणीनं आपला आणि आपल्या आईचा जीव वाचवलाय. 20 वर्षाच्या रुपाली मेश्राम हिच्या घरी रात्रीच्या सुमारास वाघ शिरला. घराबाहेर असलेल्या शेळ्यावर वाघानं हल्ला केला. त्याचा आवाज ऐकताच रुपाली शेळ्यांचा जीव वाचवायला गेली. त्यावेळी वाघानं रुपालीवरही हल्ला चढवला. पण, घाबरुन न जाता घरात शिरलेल्या वाघासोबत पंधरा मिनिट झुंज देऊन स्वःताचा आणि आपल्या आईचा जीव वाचवला.
या झुंजीत ती जखमी झालीय. रूपालीच्या डोक्याला, कमरेला व दोन्ही हातपायांना जबर दुखापत झाली आहे. तर रुपालीच्या आईला डोक्यावरही वाघाचा पंजा लागलाय. वनविभागातर्फे या मायलेकींना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या रूपालीला या घटनेने लढण्याचे बळ मिळाले असले तरी, आर्थिक मदतीपासून हे कुटुंब वंचित आहे.