ती घोडेस्वारी करायला गेली अन्

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईतल्या कुलाबा परिसरात घोडेस्वारी करायला गेलेल्या एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जानव्ही महेंद्र मिस्त्री असं या मृत मुलीचं नाव असून ती अवघ्या 6 वर्षांची होती. घोडेस्वारी करताना घोड्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. इथल्या कुपरेज बँडस्टँड मैदानात ही घटना घडली असून कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी घोडेस्वार सोहन जैसवालला ताब्यात घेतले आहे. […]

ती घोडेस्वारी करायला गेली अन्

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतल्या कुलाबा परिसरात घोडेस्वारी करायला गेलेल्या एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जानव्ही महेंद्र मिस्त्री असं या मृत मुलीचं नाव असून ती अवघ्या 6 वर्षांची होती. घोडेस्वारी करताना घोड्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. इथल्या कुपरेज बँडस्टँड मैदानात ही घटना घडली असून कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी घोडेस्वार सोहन जैसवालला ताब्यात घेतले आहे.

मुंबईतल्या खेरवाडी परिसरात राहणारी जान्हवी कुटुंबासोबत याठिकाणी फिरायला आली होती. यावेळी घोडेस्वारी करण्यासाठी ती घोड्यावर बसली असता अचानक घोड्याचा पाय घसरून घोडा खाली पडला. यावेळी जानव्हीसुध्दा खाली पडली. आणि घोड्याखाली आली. जेव्हा तिला बाहेर काढण्यात आलं तोपर्यंत ती रक्तबंबाळ झाली होती. त्यानंतर तिला जवळच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number