गायब झालेली मुलगी अखेर सापडली

कोलकता आणि बदलापुरात झालेल्या घटना ताज्या असतानाच आता बारामतीतील डोर्लेवाडी गावातील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

गायब झालेली मुलगी अखेर सापडली

२० ऑगस्ट, २०२४, बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी या गावातील अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची घटना काल सोमवारी घडली होती. त्या मुलीच्या आजोबाने बारामती शहर पोलिसात मुलगी गायब झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता या घटनेची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली होती. अखेर ती मुलगी आता सापडली आहे. बारामती शहरात गायब झालेली मुलगी चक्कर येऊन पडली होती तिला नागरिकांनी शेजारील आटोळे हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल केली होती. डॉ. प्रमोद आटोळे आणि डॉ. प्रियंका आटोळे या दापत्याने या मुलीवर वेळेवर प्राथमिक उपचार केले. शहर पोलिसांना खबर दिली पोलिसांनी त्या मुलीला बारामती एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती वैद्यकीय महाविद्यालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून सध्या तिची तब्बेत चांगली आहे. तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

राहत्या घरातून गायब झालेल्या मुलीने सोमवारी आणि मंडलवारी बारामती पुणे,  पुणे जेजुरी, जेजुरी मोरगांव असा प्रवास केल्याची तिकिटे सापडली आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्या मुलीला मनोसपचार तज्ञाची गरज आहे. सध्या त्या मुलीवर उपचार करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे मत पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी व्यक्त केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number