जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
भाजपात येण्यासाठी अनेकांची रांग लागली असून, भाजप कुणाला ऑफर देत नाही.
पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेकजण वेटिंगवर असल्याचे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
हर्षवर्धन जाधव प्रकरणावर आपली प्तिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
भाजप प्रवेशासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव केलाय. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.. माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ऑफर दिली होती असेही ते म्हणाले.