दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या वक्तव्यानंतर गिरीश महाजनांचा माफीनामा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिली व्यक्त केली आहे. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. मी केलेल्या विधानाबदद्ल मला खंत असल्याचं स्पष्टीकरणही गिरीश महाजन यांनी दिलंय. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर चौफेर टीका […]

दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या वक्तव्यानंतर गिरीश महाजनांचा माफीनामा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिली व्यक्त केली आहे. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. मी केलेल्या विधानाबदद्ल मला खंत असल्याचं स्पष्टीकरणही गिरीश महाजन यांनी दिलंय.

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर चौफेर टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी माफीनामा दिलाय. महिलांबद्दल वक्तव्य करणं यात माझी चूक झाली असून मी नकळतपणे बोललो, त्यामुळे सगळ्या महिलांची मी माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number