जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
नवीन वर्ष येण्याआधीच पुणेकरांना पीएमपीअमएलनं मोठी खुशखबर दिलीय. पीएमपीएमएलचं दैनंदिन बस फेऱ्यांमध्ये सुमारे 3 हजारांनी वाढ करण्याचं ध्येय असून ते ध्येय पीएमपीएमएलनं प्रशासनापुढे ठेवले. त्यासाठी मार्गावरील बसची सरासरी संख्या 1436 वरून 1810 पर्यंत नेण्याचा प्रयत्न पीएमपीएमएलद्वारे केला जाणार आहे.
शिवाय महिलांसाठी ‘तेजस्विनी’ नावाच्या खास बसही पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. इतकंच नाही तर 12 नवे मार्गदेखील उद्यापासून सुरु होणार आहेत. तुकाराम मुंढेंनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.