गायमुख घाटातील रस्ता दुरुस्ती काममुळे घोडबंदर रोड बंद

घोडबंदर रोड मार्गावरील गायमुख घाटात ७०० मीटर लांब रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे.

गायमुख घाटातील रस्ता दुरुस्ती काममुळे घोडबंदर रोड बंद

ठाणे : घोडबंदर रोड मार्गावरील गायमुख घाटात ७०० मीटर लांब रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे २४ मे ते ७ जून या कालावधीमध्ये पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कासारवडवली उपशाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठाणे ते घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात ७०० मीटर लांब रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबुतीकरण केले जाणार आहे. या काळात घोडबंदर रोडवर मोठ्या वाहनांची वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना कापूरबावडी जंक्शनखाली आणि वाय जंक्शन ब्रीजवर प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची मोठी वाहने कापूरबावडी वाहतूक उपशाखेजवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे पुढे जातील. तसेच मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर दिशेने जाणारी सर्वप्रकारची मोठी वाहने कापूरबावडी जंक्शनजवळून उजवे वळण घेऊन कशेळी, अंजूरफाटा मार्गे पुढे जातील. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number