लोकलच्या टपावरचा प्रवास पडला महाग, ओव्हरहेड वायरला चिकटून तरुणाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई लोकलच्या टपावरून प्रवास करणं, रूळ ओलांडणं धोक्याचं आहे, अशा सूचना वारंवार रेल्वे स्थानकांवर दिल्या जातात. मात्र, तरी या सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेक स्टंटबाज आपला जीव धोक्यात घालतात. अशीच स्टंटबाजी एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. लोकलच्या टपावर चढून प्रवास करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कल्याण-सीएसटी लोकलच्या टपावर बिनधास्तपणे प्रवास करणाऱा […]

लोकलच्या टपावरचा प्रवास पडला महाग, ओव्हरहेड वायरला चिकटून तरुणाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लोकलच्या टपावरून प्रवास करणं, रूळ ओलांडणं धोक्याचं आहे, अशा सूचना वारंवार रेल्वे स्थानकांवर दिल्या जातात. मात्र, तरी या सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेक स्टंटबाज आपला जीव धोक्यात घालतात. अशीच स्टंटबाजी एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. लोकलच्या टपावर चढून प्रवास करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

कल्याण-सीएसटी लोकलच्या टपावर बिनधास्तपणे प्रवास करणाऱा तरुण ओव्हरहेड वायरला चिकटतो. यात तो गंभीररित्या भाजला गेलाय. घाटकोपर स्थानकातील हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number