घाटकोपर रेल्वे स्टेशन बनलं सुसाईड पॉईंट; पाच दिवसात तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत पुन्हा एकदा रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचाप्रयत्न झालाय. आत्महत्या करणाऱ्या एका तरुणाला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वाचवलंय. घाटकोपर रेल्वे स्थानकात आज सकाळी एक तरुण फलाट क्रमांक 2 समोरील रेल्वे रुळावर येऊन उभा राहिला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर लोकल आली नाही म्हणून तो रेल्वे रुळावर बसून लोकल येण्याची वाट बघू लागला. […]

घाटकोपर रेल्वे स्टेशन बनलं सुसाईड पॉईंट; पाच दिवसात तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत पुन्हा एकदा रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचाप्रयत्न झालाय. आत्महत्या करणाऱ्या एका तरुणाला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वाचवलंय.

घाटकोपर रेल्वे स्थानकात आज सकाळी एक तरुण फलाट क्रमांक 2 समोरील रेल्वे रुळावर येऊन उभा राहिला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर लोकल आली नाही म्हणून तो रेल्वे रुळावर बसून लोकल येण्याची वाट बघू लागला.

याच वेळी फलाट क्रमांक तीन आणि फलाट क्रमाकी दोन वरून गर्दीने आरडा ओरडा सुरु केला असता तिथे कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या तरुणाला रेल्वे रुळावरुन वर घेतले. त्याला समजावून त्याच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले. बेरोजगारी आल्याने या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय.

गेल्या पाच दिवसात घाटकोपर स्थानकात तीन वेळा आत्महत्या करण्याच्या प्रयत्न रेल्वे रुळावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा जीव वाचविला आहे. यात एका प्रेमी युगुलाचा हि समावेश आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number