Gayatri Datar Wedding:चाहत्यांना सुखद धक्का! गायत्री दातार अडकली लग्नबंधनात, श्रीकांत चवारेसोबत घेतले सात फेरे

लोकप्रिय मराठी अभिनेत्री गायत्री दातार श्रीकांत चवारेसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

Gayatri Datar Wedding:चाहत्यांना सुखद धक्का! गायत्री दातार अडकली लग्नबंधनात, श्रीकांत चवारेसोबत घेतले सात फेरे

Gayatri Datar Wedding:  मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली गायत्री दातार आता श्रीकांत चवारे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

गायत्रीच्या लग्नसोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानेही लग्नसमारंभात उपस्थित राहून खास क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये गायत्री आणि श्रीकांत एकमेकांना हार घालताना दिसत असून, दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकत होता.

हेही वाचा: Michael Movie Collection: पॉपचा बादशहा MJ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मायकेल जॅक्सनच्या बायोपिकची ऐतिहासिक ओपनिंग; पहिल्याच दिवशी कमावले…

लग्नासाठी गायत्रीने पारंपरिक आणि आकर्षक असा गुलाबी रंगाचा साज निवडला होता. सुंदर साडी, हिरवा चुडा आणि नाजूक दागिन्यांमध्ये ती अत्यंत देखणी दिसत होती. तर श्रीकांत यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. या जोडीच्या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

लग्नाआधी गायत्रीने सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत आपल्या नात्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर अभिनेत्री लग्न कधी करणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आता ती उत्सुकता संपली असून चाहत्यांकडून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.लग्नाआधीच्या गृहप्रवेश, मेहेंदी आणि इतर विधींचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत होते. प्रत्येक सोहळ्यात गायत्रीचा आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसत होता.

हेही वाचा: Aamir Khan Emotional Video: भर कार्यक्रमात आमिर खान ढसाढसा रडला! शर्टने पुसले डोळे; पाहा मिस्टर परफेक्शनिस्टचा भावूक व्हिडीओ

गायत्रीचे पती श्रीकांत चवारे यांनी आयआयटी बॉम्बे मधून शिक्षण पूर्ण केले आहे. ते व्यावसायिकदृष्ट्या ड्रोन छायाचित्रकार म्हणून काम करतात. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राबाहेरील व्यक्तीसोबत अभिनेत्रीने संसार थाटल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता होती.एका मुलाखतीत गायत्रीने त्यांच्या प्रेमकथेचाही खुलासा केला होता. मित्र-मैत्रिणींच्या आग्रहामुळे तिने डेटिंग अ‍ॅप वापरायला सुरुवात केली होती. त्याच माध्यमातून तिची श्रीकांतसोबत ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त संवाद होत असे. नंतर भेटीगाठी वाढल्या आणि दोघांमध्ये मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

लोणावळ्यातील एका भेटीत गायत्रीनेच लग्नाचा विषय पुढे आणल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी भेट घेतली आणि लग्नाचा निर्णय सहजपणे झाला.गायत्री दातारच्या या नव्या आयुष्याच्या सुरुवातीमुळे तिचे चाहते आनंदी झाले असून सोशल मीडियावर नवदांपत्याला शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number